Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगरेशनचे धान्य आता घरपोच मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

रेशनचे धान्य आता घरपोच मिळणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

गोरगरीब जनतेला सरकार रेशनकार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देते.. रेशनचे धान्य घेण्यासाठी बऱ्याचदा नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.. ही बाब समोर आल्यानंतर मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे रेशनच्या दुकानासमोर तास न् तास उभे राहण्याची कसरत नागरिकांना करावी लागणार नाही..

सध्या फ्लिपकार्ट, अमेझॉन, ‘झोमॅटो’, ‘स्वीगी’ सारख्या कंपन्या नागरिकांना हवी ती वस्तू घरपोच करतात.. अशीच सेवा आता रेशनचीही मिळणार आहे. नागरिकांना आता घरपोच रेशनचे स्वस्त धान्य मिळणार आहे.. त्यामुळे रेशन दुकानांसमोर रांगा लावण्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.. विशेष म्हणजे, मोदी सरकारने 22 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरुही केला आहे.

कशी मिळणार सेवा..?
नागरिकांना घरपोच रेशन मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवर ‘उमंग’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.. या अ‍ॅपद्वारे नागरिक एका क्लिकवर घरबसल्या आरामात दर महिन्याला रेशन मागवू शकतात.. अगदी सरकारी दरांनुसार हे रेशन नागरिकांच्या घरी पोच केले जाणार आहे..

‘उमंग’ अ‍ॅपवरून घरपोच रेशन तर मिळेलच, शिवाय, जवळचे दुकान कुठे आहे, तसेच रेशन दुकानातील वस्तूंच्या किंमतीबाबतही जाणून घेता येणार आहे.. केंद्र सरकारने वाजवी दरात सामान्यांपर्यंत थेट वस्तू पोहोचवण्यासाठी ही खास सेवा सुरु केलीय. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शासकीय दराने वस्तू खरेदी करता येणार आहेत.

तसेच, रेशनकार्ड धारकांना ‘उमंग’ अ‍ॅपद्वारे 6 महिन्यांच्या खरेदीची माहितीही मिळेल. मराठी, हिंदी-इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी, ओडिया, बंगाली, उर्दू, गुजराती अशा 12 भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध असेल..

उमंग अ‍ॅपवर आतापर्यंत गॅस कनेक्शनपासून ते पेन्शनपर्यंत, ‘ईपीएफओ’​​सह 127 विभागांच्या 841 हून अधिक सेवा उपलब्ध होत्या.. त्यात आता घरपोच रेशनचीही सोय झाल्याने, रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.. हे नक्की..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -