Monday, July 28, 2025
Homeक्रीडाRCB vs SRH : हैदराबादचा बंगळूरवर एकतर्फी विजय

RCB vs SRH : हैदराबादचा बंगळूरवर एकतर्फी विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर IPL 2022 च्या 36व्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 9 विकेट राखून दारुण पराभव केला. हैदराबादचा हा सलग पाचवा विजय असून त्यांनी गुणतालिकेत दुस-यास्थानी झेप घेतली आहे.



तत्पूर्वी, या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 10 षटकांत 7 बाद 49 धावा केल्या आहेत. 69 धावांचे माफक आव्हान हैदराबाद संघाने 8 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. अभिषेक शर्माने सर्वाधिक 47 (27 चेंडू) धावा केल्या.


सनरायझर्स हैदराबादचा 7 सामन्यांतील हा सलग 5वा विजय आहे. याआधी संघाने पहिले दोन सामने गमावले होते. त्याचवेळी आरसीबीचा 8 सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला. संघाने 5 सामने जिंकले आहेत.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या चाहत्यांची निराशा केली आणि संपूर्ण संघ 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 68 धावांवर आटोपला. सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक 15 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहली आणि दिनेश कार्तिक शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. एसआरएचकडून मार्को येन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

हैदराबादसाठी जॅनसेनने पहिल्याच षटकात तीन बळी घेतले. पहिल्या डावातील दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने कर्णधार डू प्लेसिसला 5 धावांवर बाद केले. यानंतर विराट कोहली दुसऱ्या चेंडूवर गोल्डन डकवर आऊट झाला, तर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अनुज रावत बाद झाला. मॅक्सवेलने अवघ्या 12 धावांची खेळी केली आणि तो टी नटराजनकरवी झेलबाद झाला. सुयश प्रभुदेसाईला सुचितने 15 धावांवर यष्टिचित केले. या सामन्यात दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला आणि त्याची विकेट सुचितने घेतली, तर शाहबाज अहमदने 7 धावा करून उमरान मलिकला बाद केले. त्यानंतर नटराजनला दुसरे यश मिळाले. हर्षल पटेलच्या रूपाने बंगळुरूने आठवी विकेट गमावली. हर्षलने बाद होण्यापूर्वी आठ चेंडूंत चार धावा केल्या. नटराजनने संघाला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने हसरंगाला क्लीन बोल्ड केले. नटराजनला त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा ब्रेकथ्रू मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -