ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून हंगामात कोल्हापूर विभागात 2 कोटी 53 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापुरातील कारखान्यांच्या हंगामाचे सूप वाजले आहे. सांगलीत अद्याप दोन कारखाने सुरू असून विभागात गाळपामध्ये जवाहर तर सरासरी साखर उतार्यात सोनहिरा कारखाना भारी ठरले आहेत.
अतिरिक्त ऊस उत्पादन व ऊसतोड मजुरांची टंचाई या पार्श्वभूमीवर विभागातील साखर कारखान्यांना यंदाचा हंगाम आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सोळा सहकारी व सात खासगी साखर कारखान्यांनी तर सांगली जिल्ह्यात दहा सहकारी तीन खासगी साखर कारखाने अशा एकूण 36 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. सध्या केवळ सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा हंगाम सुरू आहे 25 एप्रिलअखेर विभागात 2 कोटी 53 लाख 18004 मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन2 कोटी98 लाख 44395 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा 12.22 टक्के आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हंगामाच्या सूप वाजले असून जिल्ह्यात एकूण 1 कोटी 60लाख 34 हजार 517 मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 1 कोटी92 लाख 42 हजार 425 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 12.18 टक्के एवढा आहे. हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने 19लाख 7298 मेट्रिक टन ऊस गाळप करून गाळपात व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल वारणा कारखान्याने 13 लाख 12860 तर दत्त शिरोळ ने12 लाख81990 मेट्रिक टन ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. सरासरी साखर उतार्यात दूधगंगा, वेदगंगा व वारणा साखर कारखान्याने 12.95 टक्के उतार्यासह जिल्ह्यात बाजी मारली आहे.
सांगली जिल्ह्यातील सहकारी दहा व तीन खासगी अशा तेरा कारखान्याने हंगाम घेतला त्यापैकी उदगिरी शुगर बामणी व सोनहिरा वांगी या कारखान्याचा गळीत हंगाम अध्यास सुरू आहे.