ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई: राजस्थान रॉयल्सने आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर (RR VS RCB) 29 धावांनी विजय मिळवला. राजस्थानने आजचा सामना जिंकून या सीजनमधील मागच्या पराभवाचा हिशोब चुकता केला. राजस्थानची फलंदाजी आज अपेक्षेनुसार ५ झाली नाही. 20 षटकात त्यांना फक्त 144 धावाच करता आल्या. रियान परागमुळे (Riyan parag) राजस्थानला लढण्याइतपत धावसंख्या उभारता आली. RCB ला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते. T-20 क्रिकेटच्या दृष्टीने ही फार मोठी धावसंख्या नाहीय.
पण राजस्थानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करुन आरसीबीला विजयपासून वंचित ठेवलं. राजस्थानच्या 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा डाव 115 धावात आटोपला. RCB चा संघ रथी-महारथी स्टार खेळाडूंनी भरलेला आहे. वास्तविक त्यांच्यासाठी हे खूप सोपं लक्ष्य होतं. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.