Monday, July 7, 2025
Homeक्रीडाशेवटच्या चेंडूवर राशिदचा SIX, गुजरातचा थरारक विजय, हरलेला सामना जिंकला

शेवटच्या चेंडूवर राशिदचा SIX, गुजरातचा थरारक विजय, हरलेला सामना जिंकला

ताजी बातमी ऑनलाईन टीम


मुंबई: क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमधला सर्वात रोमांचक सामना पहायला मिळाला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आज हरलेला सामना जिंकला. या विजयाचा नायक ठरला राशिद खान. सनरायजर्स हैदराबादने गुजरातला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिल होते. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 23 धावांची गरज होती. राहुल तेवतिया आणि राशिद खानची जोडी मैदानात होती. मार्को जॅनसेन गोलंदाजी करत होता.



राशिद खानने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून गुजरातला एक थरारक विजय मिळवून दिला. राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. यात चार सिक्स होते. राहुल तेवतिया (Rahul Tewtia) 21 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि दोन सिक्स मारले.



गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेटने विजय मिळवला. क्रिकेट रसिकांना आज एक थरारक सामना पहायला मिळाला. गुजरातने सनरायजर्स हैदराबादवर पाच विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह गुजरातने मागच्या सामन्यात झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -