‘आयपीएल’च्या यंदाच्या पर्वात रोज नवेनवे किस्से समोर येत आहेत. क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील वाद आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. संघाच्या विजयासाठी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफही जीवतोड मेहनत घेत असल्याचे दिसते.. मात्र, एवढं सगळं करुनही पदरी अपयश येत असेल, तर चिडचीड तर होणारच..
ऑस्ट्रेलियाचा रिकी पाॅंटिंग आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो.. ‘आयपीएल’मधील दिल्ली संघाचा तो कोच आहे.. त्यामुळे इथेही त्याचा आक्रमक बाणा पाहायला मिळतो.. रविवारी (ता. 24) ‘दिल्ली कॅपिटल्स’ विरुद्ध ‘राजस्थान रॉयल्स’ यांच्यातील मॅच चांगली वादग्रस्त झाली.
जवळच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं रिकी पाॅंटिंग गेल्या पाच दिवसांपासून क्वारंटाईन होता. दिल्ली विरुद्ध राजस्थानमध्ये झालेली मॅच पाॅंटिंगला बंद खोलीत पाहावी लागली.. मात्र, तेथेही त्याला रागावर कंट्रोल ठेवता आला नाही.. त्याने हाॅटेलमध्ये चांगलाच राडा घातल्याचं समोर आलंय..
रिकी पाॅंटिंगचा हाॅटेलमध्ये राडा..
‘क्वारंटाईन’मधून बाहेर आल्यावर खुद्द रिकी पाॅंटिंग यानेच ही माहिती दिली. तो म्हणाला, की दिल्ली विरुद्ध राजस्थानची मॅच बंद खोलीत पाहण्याचा अनुभव खूप त्रासदायक होता.. मॅच दरम्यान माझ्याकडून रागाच्या भरात तीन-चार रिमोट तोडले गेले. तसंच काही पाण्याच्या बाटल्या भिंतीवर फेकल्या. त्या मॅचमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडल्या नाहीत. आता त्यातून कमबॅक करणंच चांगले आहे..’
कोच असूनही तुमच्या नियंत्रणात गोष्टी नसतील, तर अवघड आहे. आमच्या टीममध्ये कोरोना पेशंट्स जास्त आढळले. आता या सगळ्यातून बाहेर पडून दुसऱ्या हाफमध्ये टीमला चांगला खेळ करावा लागणार आहे,’ असे तो म्हणाला.
आम्ही विजयी मार्गावर परतण्याच्या अगदी जवळ आहोत. आम्हाला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. सकारात्मक राहावे लागेल. पुनरागमनाची जितका जास्त प्रयत्न करू, तितकं ते आमच्यासाठी अवघड होईल. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्ये खेळताना खेळाडूंनी गरजेपेक्षा जास्त तणाव घेऊ नये. सध्या परिस्थितीमध्ये संयम आवश्यक असल्याचं त्यानं सांगितलं..