Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हाेपूर : डीपीला फोटो न लावल्याने मारहाण; नैराश्यातून युवतीची आत्महत्या

कोल्हाेपूर : डीपीला फोटो न लावल्याने मारहाण; नैराश्यातून युवतीची आत्महत्या

पोळगाव (ता. आजरा) येथील एका अल्पवयीन युवतीने युवकाच्या त्रासाला कंटाळून आत्म्हत्याी केल्यावची धक्कावदायक घटना घडली. या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी किशोर दत्तात्रय सुरंगे (रा. महागाव ता. गडहिंग्लज) याच्यावर आजरा पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. यामुळे किशोरच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांना लग्नाबाबत विचारणा केली होती. यावेळी मुलीच्या कुटुंबाकडून मुलगीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न लावून देतो असे सांगितले होते. यानंतर किशोरने मुलीला सोशल मीडियावर डीपीला फोटो लाव नाहीतर तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगितले. तसेच याबद्दल आजरा बसस्थानक परिसरात मारहाणदेखील केली होती.

या त्रासाला कंटाळून नैराश्यातून मुलीने मंगळवारी (दि. २६) राहत्या घरात तुळीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याैची घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेघशनमध्ये या घटनेची तक्रार नोंद केली असून, पोलिसांनी युवकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -