ताजी बातमी ऑनलाईन टीम
कुपवाड जवळ इंडिका गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी श्रीकांत मलगोंडा पाटील वय 65 वर्षे ,व्यवसाय शेती , राहणार मिरज कुपवाड रोड , हनुमान नगर कुपवाड , हे त्यांचे मित्र प्रकाश कलाप्पा गायकवाड ,वय 58 वर्ष , असे दोघे जात असता कुपवाड एमआयडीसीकडून पाठीमागून आलेल्या इंडिका गाडी नंबर MH 10 AG 2524 या गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने , त्यामध्ये प्रकाश यल्लाप्पा गायकवाड यांच्या डोक्यास मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत ,तसेच अपघातानंतर कार चालक पळून गेला आहे , याबाबत श्रीकांत मलगोंडा पाटील यांनी इंडिका गाडीचा चालक विजय दिलीप ऊनउणे , राहणार कानेटकर , शाळे जवळ , आंबा चौक कुपवाड याच्याविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली असून , सदर अपघाताचा पुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार झामबाडे हे करीत आहेत.
कुपवाड जवळ इंडिका गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -