Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दैवी शक्‍तीने भविष्य बदलण्यावरून लाखोंचा गंडा!

कोल्हापूर : दैवी शक्‍तीने भविष्य बदलण्यावरून लाखोंचा गंडा!

दैवी शक्‍तीने पूर्वीच्या आयुष्यातील चुका दुरुस्त करून पुढील आयुष्य (life) सुधारण्यासाठी व वेगवेगळ्या अनुष्ठान साधनेसाठी वेळोवेळी 8 लाख 40 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार श्रीकांत यशवंत सावंत (रा. सरवडे, ता. राधानगरी) यांनी राधानगरी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी प्रकाश बाळू गुरव याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

सरवडे येथील मेकॅनिकल इंजिनिअर असणारे श्रीकांत सावंत यांची प्रकाश गुरव (रा. आडी, जि. बेळगाव) याच्याशी ओळख झाली. गुरव याने सावंत यांचे पुढील आयुष्य (life) तसेच त्यांच्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी आपल्याकडील दैवी शक्‍तीने देवाकडे प्रार्थना करतो, असे सांगितले. त्यासाठी त्याने सावंत व त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या अनुष्ठान व साधना करायला लावून सावंत यांच्याकडून 7 एप्रिल 2021 ते आतापर्यंत 90 हजार रुपये रोख रक्‍कम घेतली आहे.

याबरोबरच त्याने मुरगूड येथे असलेल्या जागेत सावंत यांना हिस्सा देतो, असे सांगून पुणे येथील प्रोजेक्टमध्ये गुरव याने आपल्या नावाने फ्लॅट बुकिंगगाठी सावंत यांच्याकडून 7 लाख 50 हजार रुपये घेतले. या रकमेची मागणी करताच ती न दिल्याने सावंत यांनी गुरवविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -