ताजी बातमी ऑनलाईन टीम
खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) आज डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांच्या हातामध्ये हनुमान चालिसा पाहायला मिळाली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चँलेज दिले. ‘मी अशी काय चूक केली की त्याची शिक्षा मला देण्यात आली, असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) केला आहे.
नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘मी अशी कोणती चूक केली? की त्याची मला शिक्षा देण्यात आली. प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमान चालिसाचे पठण करणं चूक असेल आणि त्यासाठी मला १३-१४ दिवसांची शिक्षा ठाकरे सरकारने दिली असेल तर १४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास मी तयार आहे. माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही.’, असे त्या म्हणाल्या.
नवनीत राणा यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ओपन चँलेज दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असे आव्हान त्यांनी केले आहे. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महत्वाचे म्हणजे, महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) कडे करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.