Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली : बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यावर छापा; जत पोलिसांची मोठी कारवाई

सांगली : बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यावर छापा; जत पोलिसांची मोठी कारवाई

ताजी बातमी ऑनलाईन टीम
शहरातील विठ्ठल नगर येथील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीर सावकारी करणार्‍याचा पर्दाफाश केला. या कारवाईत वीस कोरे स्टँप, वेगवेगळ्या बँकेचे ७८ चेक, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी कार, यासह अनेक मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. ही कारवाई (शुक्रवार) करण्यात आली. जत तालुक्यातील आतापर्यंतची ही मोठी कारवाई असल्‍याचे म्‍हटले जात आहे. एका फिर्यादीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.



या प्रकरणी पोलिसांनी सुभाष उर्फ लखन पवार (रा. विठ्ठलनगर, जत) याच्याविरोधात सावकारी अधिनियम, खंडणीचा गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर संशयित आरोपी पवार हा फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.



पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहरातील एका तक्रारदाराने सुभाष पवार याच्‍याकडून १६ ऑक्टोंबर २०२१ रोजी एक लाख 50 हजार रुपये आठवड्याला १२ टक्के व्याजदराने घेतले होते. आज अखेर तक्रारदार याने दोन लाख 52 हजार रुपये परत केले आहेत. या व्यतिरिक्त संशयित आरोपी सुभाष पवार याने तक्रारदाराकडे आणखी दोन लाख १० हजारांची मागणी केली. तसेच त्‍याचे अपहरण करण्‍याची धमकीही दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -