Sunday, December 22, 2024
Homeआरोग्यविषयककोल्हापूर : जिल्ह्यात वर्षभरात आढळले थॅलेसेमियाचे नवे 25 रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात वर्षभरात आढळले थॅलेसेमियाचे नवे 25 रुग्ण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

थॅलेसेमिया आजाराशी झुंज देणार्‍या रुग्णांना प्रत्येकी 20 ते 25 दिवसांमध्ये कमीत कमी एक युनिट रक्ताची गरज भासते. या आजारापासून वाचण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावी लागते. परंतु, त्यासाठी सहजासहजी डोनर उपलब्ध होत नाही. असे विदारक चित्र एका बाजूला असताना कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात तब्बल थॅलेसेमियाचे नवे 25 रुग्ण सापडले असून जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या थॅलेसेमिया रुग्णांची एकूण संख्या 175 असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाकडून देण्यात आली.



नवीन सापडलेल्या थॅलेसेमिया रुग्णांमध्ये 6 महिने ते दीड वर्षाच्या मुलांचा यामध्ये समावेश आहे. थॅलेसेमिया रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. यात रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते. देशात दरवर्षी सुमारे 12 हजारांवर थॅलेसेमियाग्रस्त मुले जन्माला येतात. थॅलेसेमियाचे ‘मायनर ’ ‘मेजर’ आणि ‘इंटर मीडिया’ असे प्रकार आहेत. मेजर स्वरूपातील थॅलेसेमियाग्रस्तांचे जगणे म्हणजे आयुष्यभर यातनाच सहन कराव्या लागतात. पंधरा दिवस किंवा दरमहा शरीरातील रक्त बदलणे हाच त्यांच्या जगण्याचा पर्याय आहे.



थॅलेसेमिया टाळण्यासाठी विवाहपूर्व रक्ताची चाचणी महत्त्वाची आहे. आई-वडील जेव्हा थॅलेसेमिया वाहक (मायनर) असतात. तेव्हा प्रत्येक गर्भवती मातेच्या पोटात मेजर थॅलेसेमियाग्रस्त मूल जन्माला येण्याची शक्यता असते. मायनर थॅलेसेमिया हा लोकसंख्येच्या चार टक्के मुलांमध्ये आढळत असल्याचे रक्त तज्ज्ञांनी सांगितले. औषधोपचाराने हा आजार बरा होत नाही. फक्त जगण्यासाठी औषधे घ्यावी लागतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -