Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरKolhapur Crime : कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यू

Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून मजुराचा मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : गोदामातील साखरेच्या पोत्यांची थप्पी अंगावर पडून एका मजुराचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. कोल्हापुरातल्या आसुर्ले पोर्लेमधील दत्त दालमिया साखर कारखान्याच्या गोदामात (Godown) ही घटना घडली आहे. शेरेबंग नारझाया असे मृत कामगाराचे नाव आहे. तर या दुर्घटनेत एक मजुर जखमी झाला आहे. बिस्टू बसूमातारी असे गंभीर जखमी झालेल्या मजुराचे नाव आहे. जखमी कामगारावर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साखर गोदामातील पोती ट्रकमध्ये भरत असताना हा प्रकार घडला.


म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या मधीन माहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत,
एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू, एकावर उपचार सुरु
गोदामात साठवलेल्या साखरेची विक्री आणि बाहेरील गोदामात पोती स्थलांतरीत करण्याचे काम शनिवार दुपारी सुरु होते. यावेळी मजुर पोती गोदामात भरण्याचे काम करत होते. यावेळी शेरेबंग नारझाया या मजुराच्या अंगावर थप्पीतील काही पोती पडली. पोत्याखाली सापडलेल्या मजुराला वाचवण्याचा प्रयत्न इतर मजुर करीत होते. मात्र त्याचदरम्यान 60 फूट उंच पोत्यांची थप्पी पुन्हा कोसळली. शेरेबंग हा या पोत्यांखाली पूर्णपणे गाडला गेला. पोती पडताना जीव वाचवण्याच्या प्रतयत्नात दुसरा मजुर बिस्टू बसूमातारीचे डोके बेल्टच्या पट्ट्यावर धडकले. दोन्ही जखमी मजुरांना उपचारासाठी कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शेरेबांग याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -