ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात पश्चिम महाष्ट्रातील इनडोअर स्टेडियम(Indoor stadium) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री. पाटील म्हणाले, राज्यातील महानगरपालिकांना मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर मनपाकरिता १० कोटी रुपयांचा निधी मिळाला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
हा निधी उपलब्ध होण्यासाठी नगरविकास विभागाकडे माझ्या कार्यालयाकडून पाठपुरावा केला होता. सदर प्रकल्पाअंतर्गतची कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणी होणे गरजेचे असून या माध्यमातून मनपा क्षेत्रात इनडोअर स्टेडियमच्या(Indoor stadium) कामासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या स्टेडियमच्या माध्यमातून क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडू आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी, श्री. पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. जिल्ह्याची असलेली क्रीडा संस्कृती जोपासत खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या तयार होणान्या इनडोअर स्टेडियममुळे(Indoor stadium) खेळाडूंना सराव करण्यासाठी अधिकची जागा मिळणार आहे. खेळाडूंना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
महाविकास आघाडी सरकार राज्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मी कोल्हापूरकरवासीयांकडून मनःपूर्वक आभार मानतो, अशा भावना पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी आमदार जयश्री जाधव, संजय मोहिते ( मा. उपमहापौर) नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.
पश्चिम महाष्ट्रातील इनडोअर स्टेडियम कोल्हापूरात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -