Friday, February 27, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! या परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला

धक्कादायक! या परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला

भाजीच्या दराची चौकशी आपल्याकडे केली व शेजारच्याकडून भाजी घेतल्याच्या रागातून एका भाजी विक्रेत्याने ग्राहकावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घोरपडीमध्ये घडला आहे.
याबाबत घोरपडीमधील उदय बाग येथील एका ३४ वर्षाच्या नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १६६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अब्दुल नावाच्या भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ग्राहक हा देव मानला जात असतो. पण आता त्याने कोणाकडून काय खरेदी करावे, हे विक्रेते ठरविणार की काय असा प्रसंग घोरपडीतील फुटपाथवर घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पबाहेरील फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी एका भाजीविक्रेत्याला भाजीचे दर विचारले. त्याच्याकडील भाजीचे दर जास्त होते. फिर्यादीस न परवडल्यामुळे त्यांनी त्याच्या शेजारी असणाऱ्या दुसऱ्या भाजी विक्रेत्याकडून भाजी घेतली. याचा राग आल्याने या भाजी विक्रेत्याने फिर्यादीस लाकडी दांडक्याने हातावर मारहाण केली. लहान चाकूने फिर्यादीचे हाताचे तळावर वार करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -