Saturday, February 21, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जिल्हा बँकेच्या शाखेला ग्रामस्थांकडून टाळे

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या शाखेला ग्रामस्थांकडून टाळे

दत्तवाड (ता. शिरोळ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक (केडीसीसी) शाखेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, सभासद यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्वरित कर्मचाऱ्यांची भरती करावी, या मागणीसाठी दतवाड ग्रामस्थांच्या वतीने आज (शुक्रवार) जिल्हा बँक शाखेला टाळे ठोकण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कणा समजली जाते. दत्तवाड परिसरातील अनेक गावासाठी दतवाड येथे एकच शाखा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, महिला बचत गट आर्थिक व्यवहारासाठी येत असतात. शिवाय, लाईट बील भरण्यासाठीही मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरिकांना अनेक तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे जोपर्यंत बँकेत आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती होत नाही. तोपर्यंत बँक उघडू देणार नसल्याचा निर्धार करत आज ग्रामस्थांच्यावतीने बँकेला टाळे ठोकण्यात आले.

याप्रसंगी डी. एन. सिद्धनाळे, लाला मांजरेकर, बसगोंडा तोडकर, सतीश सिदनाले, मेहबूब अपराध, अभिषेक हेब्बाळे, चंद्रकांत बिरणगे, दादा सिद्धनाळे, अभिनंदन पाटील, संस्कार गळगे आदीसह बँकेचे शाखाधिकारी जुगळे व शाखेचे काही मोजके कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -