Friday, January 30, 2026
Homeइचलकरंजीचेन स्नॅचिंग करणारी टोळी गजाआड : इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

चेन स्नॅचिंग करणारी टोळी गजाआड : इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यात गँगचा धुमाकूळ; गँगकडून तीन गुन्ह्यातील ४० ग्रॅमचे दागिने जप्त

शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी कुख्यात इराणी हिसडा गँगच्या म्होरक्यासह चौघांना अटक केली. गँगचा प्रमुख अब्बास असलम झैदी ( वय ३१, रा. भोजे लोहगाव, जि. पुणे ) त्याचे साथिदार शरीफ शहा समरेश शहा (वय २६, मनमाड, ता. नादगाव, जि. नाशिक), रफिक कासीमभाई मदारी ( वय ३५, रा. तामसवाडी, जि. जळगाव ), राजेश रामविलास सोनार ( वय ३६, रा. कल्याण, जि. ठाणे) अशी त्यांची नावे आहेत.



या गँगकडून चेनस्नॅचिंगच्या वेगवेगळ्या तीन गुन्ह्यातील दोन लाख रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या गँगने महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यात चेनस्नॅचिंगचे सुमारे ३० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -