ताजी बातमी ऑनलाईन टीम
अल्पवयीन मुलीला अश्लिल बोलून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी प्रेम राजू आवळे (रा. भाग्यरेखा चित्रमंदिरसमोर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने दिली आहे.
पिडीत मुलगी घरासमोर भांडी घासत होती. त्यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या प्रेम याने वडापाव खाण्याचे अमिष दाखवले. मोटरसायकलीवरुन नेऊन मोकळ्या शेतात घेऊन जात
अश्लिल बोलून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आई-वडीलांना सांगितल्यास त्यांना मारुन टाकणार अशी धमकीही दिली. अधिक तपास पोऊनि सावंत करीत आहेत.