अकिवाट ता शिरोळ येथे घराचे कुलुप तोडून चोरट्यांने सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 60 हजार रुपये रोकड असा 1 लाख 8 हजाराचा ऐवज पळविला विद्यानंद आदिनाथ दानोळे अकिवाट यांनी कुरुंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी, अकिवाट येथील काळम्मावाडी रस्त्यावरील कागे वेस येथील दानोळे परगावी गेले असता सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्याचा घराचे कुलूप उचकटून लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून पितळी डब्यात ठेवलेली कानातील सोन्याची फुले, रीगा व 2 अंगठ्या, चांदीचे 2 ब्रेसलेट व 6 जोड लहान मुलांचे पैंजण करदोडा चांदीचे ताट चमचा वाटी देवाचे आरती सेट असा 48 हजाराचा ऐवज आणि 60 हजार रोकड असा 1 लाख 8 हजाराचा ऐवज चोरुन नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -