Saturday, December 21, 2024
Homenewsमाकड अंगावर बसल्याच्या भीतीनं चिमुकल्याच्या मनात केलं घरं, रिपोर्ट आले नॉर्मल पण...

माकड अंगावर बसल्याच्या भीतीनं चिमुकल्याच्या मनात केलं घरं, रिपोर्ट आले नॉर्मल पण तरीही झाला मृत्यू

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत असते. मोठ्यांपासून लहानांपर्यंत पण चिमुकल्यांना जरा जास्तच या बाबतीत जपावं लागतं. पालकांचं थोडंस दुर्लक्ष किंवा थोडा झालेला कानाडोळा चिमुकल्याच्या जीवावर बेतू शकतं. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका प्राण्यामुळे चिमुकल्याचा जीव गेला. या प्राण्याने त्याला काही केलं नाही मात्र त्याबद्दल असणारी भीती चिमुकल्याच्या जीवावर बेतली.



माकड अंगावर बसल्याच्या धास्तीने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बारडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. माकड अंगावर बसलं याची धास्तीच त्याने घेतली आणि त्याची प्रकृती खालवली. ही भीती त्याच्या जीवावर बेतली आहे.



नांदेडमध्ये 10 वर्षांचा वीर संगेवार हा घरासमोर खेळत होता. बॉल घराच्या छतावर गेल्याने तो छतावर गेला. त्याचवेळी एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसलं. माकड अंगावर बसल्याची त्यानं भयंकर धास्ती घेतली. त्यातच त्याला ताप आला. वीरची प्रकृती बिघडत असल्याने पालकांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं.



वीरला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या, त्या सगळ्या नॉर्मल आल्या. वीरची माकडाची भीती कमीच होत नव्हती नव्हती. या भीतीनं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आपल्या चिमुकल्याला असं एकटं सोडू नका. पालकांनी डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे लक्षं देणं खूपच महत्त्वाचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -