शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराची (temple) दुरुस्ती आणि संवर्धन आता पुरातत्त्व खात्याऐवजी रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार असल्याचा दावा ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केला आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय ‘एमएसआरडीसी’ला हे काम करता येणार नाही, असे पुरातत्त्व विभागाने बजावल्याने या मंदिराची टमाटी ग x गार काय? यंदाही महापूर आल्यास me importan रक्षेचे काय? असे प्रश्न निर्माण झाले.
मंदिरांच्या जतन-संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाचे आहे. पुरातन मंदिरांच्या (temple) संवर्धनाचे काम करणारी तज्ज्ञ कारागीर मंडळी आहेत. हे काम वेळखाऊ असून, ते बारकाईने करावे लागते. अगोदरच रस्त्यांच्या कामात व्यस्त असलेल्या रस्ते विकास महामंडळाला संवर्धनासाठी त्या पद्धतीचे तज्ज्ञ कारागीर मिळणार का? असा सवाल इतिहास अभ्यासकांनी केला आहे.
मंदिरांच्या संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाकडून होणे गरजेचे असल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगितले आहे. तरीदेखील राज्य सरकारने सर्वेक्षणाची जबाबदारी महामंडळावर सोपवून पहिल्या टप्प्यातील कामाकरिता 101 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, संवर्धनाच्या कामात महामंडळाला कितपत यश येणार, हे कामाला सुरुवात झाल्यानंतर समजणार आहे. रस्ते विकास महामंडळाने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प संचालकांची नियुक्ती केली असून, तसा अहवाल लवकरच तयार होणार आहे.





