Thursday, November 13, 2025
Homeसांगलीमिरजे : सापडलेली सोन्याची चेन केली परत..!युवकांचा प्रामाणिकपणा:सर्वत्र कौतुक

मिरजे : सापडलेली सोन्याची चेन केली परत..!युवकांचा प्रामाणिकपणा:सर्वत्र कौतुक


मिरजेतील योगीता मंडले यांची सोन्याची चैन चार वर्षांपूर्वी गहाळ झाली होती.सर्वत्र शोधाशोध केली पण चैन मिळाली नाही.त्यामुळे मंडले परिवाराने आशा सोडली होती.या घटनेला चार वर्ष झाली पण सोमवारी अचानक मंडले कुटुंबांची वाॅशिग मशीन बंद पडल्याने त्यांनी जावेद नरगुंदे यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिली.वाॅशिंग मशीन दुरुस्त करत असताना जावेद नरगुंदे या युवकाला ही चैन वाॅशिग मशीन मध्ये सापडली.लगेच जावेद नरगुंदे यांनी मंडले कुटुंबाला फोन करुन चैन सापडल्याचे सांगितले.

योगिता मंडले यांना जावेद नरगुंदे यांनी ती सोन्याची चैन सुपुर्त केली.तर ही चैन कपडे धुतेवेळी पडली असावी असा अंदाज जावेद यांनी लगावला.नरगुंदे या युवकाचा प्रामाणिकपणा पाहून त्यांच्या प्रामाणिकपणाचा किस्सा हा योगिता मंडले यांनी फेसबुक वर शेअर केला.सर्वत्र त्यांचे कौतुक झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -