Thursday, July 3, 2025
Homeमनोरंजनसुख म्हणजे नक्की काय असतं : गौरी देणार गुड न्यूज?

सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरी देणार गुड न्यूज?



घरातील वादानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मराठी मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. जयदीप-गौरी घड सोडून चाललेले असतात. त्यांना विनवणी केली जाते की, कृपया घर सोडून जाऊन नका; पण जयदीप-गौरी ऐकत नाहीत. ते आपले साहित्य घेऊन घराबाहेर पाऊल टाकतात, तोपर्यंत जयदीपची आई गाडीतून येते. ती म्हणते, कुठे चाललात गौरी-जयदीप? काय झालं? गौरी आई म्हणून हाक मारते, तोपर्यंत ती चक्कर येऊन पडते. या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी गौरीच्या घरात गोड बातमी ऐकायला मिळणार आहे.


गौरीची भूमिका गिरीजा प्रभू हिने साकारलीय. गौरीला चक्कर आल्यानंतर तिची डॉक्टर तपासणी करतात. डॉक्टर सांगतात की, जयदीपराव तुम्ही बाप होणार आहात. गौरी आई होणार अशल्याचे पाहून जयदीपच्या आईला खूप आनंद होतो. पण, या गुड न्यूज नंतर घरामध्ये आणखी काय काय घडणार? गौरीची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं रंजक असेल.

सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेत गौरीची भूमिका अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने साकारलीय. तर जयदीपची भूमिका मंदार जाधव याने साकारलीय. तिच्यासोबत शालिनीची भूमिका माधवी निमकर, मीनाक्षी राठोड, सायली साळुखे, वर्षा उसगावकर यांच्याही भूमिका आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -