हिंदू धर्मात नागपंचमीच्या सणाला (Nag Panchami 2022 ) विशेष महत्त्व आहे. हा सण दरवर्षी हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना श्रावण (Shravan Month) महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा नागपंचमीचा सण (Nagpanchami Festival) मंगळवारी म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख-शांती राहते, असे म्हटले जाते. अनेक जण नागपंचमीच्या दिवशी उपवासही करतात. या दिवशी गरजूंना दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी घरात मातीपासून सापाच्या मूर्तीही तयार करुन त्याची पूजा केली जाते. नागदेवतेला फुले, मिठाई आणि दूध अर्पण केले जाते.
नागपंचमी शुभ मुहूर्त –
नागपंचमी – मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 रोजी
नागपंचमी तिथी – 02 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:13 वाजता सुरू होईल.
नागपंचमी तिथी – 03 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 05:41 वाजता समाप्त होईल.
पूजेची शुभ वेळ – सकाळी 06:05 ते 08:41 पर्यंत.
नागपंचमीच्या दिवशी काय करावे
– नागपंचमीच्या दिवशी उपवास ठेवा. या दिवशी उपवास केल्याने साप कधीच दंश करत नाही, असे मानले जाते.
नाग देवतांना दूध, मिठाई आणि फुले अर्पण करा.
– नाग पंचमी मंत्राचा जप करा.
– ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहेत त्यांनी या दिवशी व्रत ठेवावे.
नागपंचमीच्या दिवशी काय करू नये –
– नागपंचमीच्या दिवशी माती उखरु नये, शेतात नांगर चालवू नये. त्यामुळे सापांना इजा होण्याचा धोका असतो.
– या दिवशी झाडे तोडू नका. यामध्ये लपलेल्या सापांना इजा होऊ शकते.
– शिवणकामाशी संबंधित कोणतेही काम करू नका. म्हणजेच सुईचा वापर करु नका. कारण ते अशुभ मानले जाते.
– नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न खाऊ नका.
नागपंचमीचे महत्त्व –
सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नाग देवतांपर्यंत पोहोचते असे मानले जाते. म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवतांच्या रूपात जिवंत सापांची पूजा करतात. हिंदू धर्मात सापांना सर्प देवता म्हणून पूजनीय मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्याने सर्पदंशाचा धोका कमी होतो. या नागाची दुधाने स्नान करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते.