ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय कटरने फोडून घरफोडी केलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राष्ट्रीय महामार्गावर कागल जवळील लक्ष्मी टेकडी परिसरात अटक केली. राजकुमार पंडीत विभुते (वय ४२ रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले साहित्य, इन्शुरन्स कंपनीचे चेकबुकसह मोटारकार असा सुमारे ४ लाख ३४ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापुरातील घरफोडीप्रकरणी सोलापूरचा सराईत गुन्हेगार गजाआड; रोकड गायब मात्र, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -