ताजी बातमी ऑनलाईन टीम
अनेक सुपरहिट चित्रपट घेऊन येणारा रोहिट शेट्टी नवा चित्रपट आणतोय. सिंघमच्या सीरीजचा तिसरा भाग तो घेऊन येतोय. यासंदर्भात त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे की, सिंघम-३ चे शूटिंग कोणत्या दिवशी सुरू होणार आहे. रोहित शेट्टीने नुकतेच ‘सिंघम ३’चे शूटिंग सुरू करण्याबाबत सांगितले.
एका मुलाखतीत रोहितने सांगितले की, या चित्रपटाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. सध्या अजय देवगण आणि तो दोघेही त्यांच्या कामात बिझी आहेत. त्यामुळे पुढील वर्षी एप्रिलपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. रोहित शेट्टीने मल्टीस्टारर चित्रपटांबद्दलही संगितले आहे.