Saturday, January 24, 2026
Homeकोल्हापूरहुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

निसर्ग आपल्या अचंबित करणाऱ्या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण जगात एलियन्ससंबंधी गूढ आहे. याबाबत अनेक दावे करण्यात येतात. मात्र, हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे असाच कुतूहल आणि वैशिष्ट्यपूर्ण असा आविष्कार पहायला मिळाला. अंगणात असलेल्या झाडावरील पानावर एलियन्ससारखी दिसणारी अनोखी अळी आढळून आली.


येथील पैलवान सचिन पाटील यांच्या अंगणात विविध रोपे लावण्यात आली आहेत. तेथे असणाऱ्या चाफ्याच्या रोपावर रविवारी अळ्या असल्याचे दिसले. या अळ्या पाने कुरतडून खात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे विशाल माळी-कुर्ले यांनी त्याची पाहणी केली असता या अळीचा चेहरा एखाद्या एलियन्ससारखा दिसला. या अळीबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. निसर्गाच्या अचंबित करणाऱ्या आविष्काराचाच तो एक भाग आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -