ताजी बातमी ऑनलाईन टीम
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने बंद झालेले राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळी चार वाजता पुन्हा एकदा उघडले आहेत. ४ आणि ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून ५ हजार 712 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर विद्युत गृहातून १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून एकूण 7312 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.
गेल्या 24 तासात पासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने उसंत घेतली होती. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानंतर राधानगरी धरणाचे बंद झालेले स्वयंचलित दरवाजे पुन्हा एकदा उघडल्याने कोल्हापूरकरांच्या वर आजही महापूराची धास्ती कायम आहे.