Tuesday, July 1, 2025
Homeकोल्हापूर'आदित्य यांचं बोलणं जिव्हारी'; कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप; एकानं पक्ष सोडला, दुसऱ्याचा...

‘आदित्य यांचं बोलणं जिव्हारी’; कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप; एकानं पक्ष सोडला, दुसऱ्याचा उपनेतेपदाचा राजीनामा

कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. संजय पवार यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तर नुकतीच कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहरप्रमुखपदी निवड झालेल्या हर्षल सुर्वे यांनीही पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा देत पक्षच सोडला आहे.

 

संजय पवारांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यापुढे सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राजीनामा आम्हाला मंजूर नाही, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

 

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहरप्रमुखपदी हर्षल सुर्वे यांची नुकतीच निवड करण्यात आली. हर्षेल सुर्वेंनी जिल्हाध्यक्षपदाची मागणी केली होती. पण त्यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहरप्रमुखपद देण्यात आले. या पदाधिकारी निवडीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत अनेकांची नाराजी व्यक्त केली.

 

संजय पवार यांच्याकडे शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख दोन पदे होती. त्यामुळे गेले काही दिवस जिल्हाप्रमुख बदलाबाबत हालचाली सुरू होत्या. अखेर इंगवले यांना पक्षश्रेष्ठींनी संधी देत त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.

 

‘आदित्य साहेबांची प्रतिक्रिया जिव्हारी लागली’

 

दरम्यान, हर्षल सुर्वे यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून ते शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ”साहेब माझी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नाही. त्यामुळे मनातील खदखद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तीच जास्त जिव्हारी लागली. आजपर्यंत आदेश माणूनच काम केले होते. कधी आदेश डावलला नाही. पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला, निर्णय मान्य नसेल तर निघून जावा. मला निर्णय मान्य नाही. साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदचा राजीनामा देत आहे.” असे हर्षल सुर्वे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

 

हर्षल सुर्वे यांचे राजीनामा पत्र.

‘…यामुळे हा उद्रेक झाला’, संजय पवार काय म्हणाले?

 

”नवीन जिल्हाप्रमुखांची नेमणूक झाली म्हणून आम्ही नाराज नाही. जी नेमणुकीची प्रक्रिया होती ती आम्हाला आवडली नाही. ती चुकीची झाली असे आमचे मत आहे. सर्वस्वी अधिकार हा उद्धव साहेबांचा आहे. तो आम्हाला मान्य आहे. पण जे पदाधिकारी इच्छुक होते. त्यांना एकत्र घेऊन निर्णय झाला असता तर बरे झाले असते. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे भावना व्यक्त के,ल्या त्यातून हा उद्रेक झाला आहे,” अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी ‘पुढारी न्यूज’शी बोलताना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -