ताजी बातमी ऑनलाईन टीम
विटा ; खानापूर तालुक्यातील भिवघाट ते पळशी रस्त्यावर हिवरे गावाच्या हद्दीत दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. नवनाथ जनार्दन पाटील (वय ६०, रा.
पळशी, ता. खानापूर) असे मृताचे नाव असून ते आज सकाळी रक्षाबंधनासाठी बहिणीकडे विट्याला येत होते, अशी माहिती विटा
पोलिसांनी दिली.
याबाबतची हकीकत अशी की, आज (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्गावरून कराडच्या दिशेने कर्नाटक पासिंगचा (केए २३ ए ३४४१) ट्रक निघाला होता. रस्ता विचारण्यासाठी भिवघाट परिसरातील कल्याणी पेट्रोल पंपसमोर हा ट्रक थांबला होता. त्याच वेळी पळशीहून विट्याकडे नवनाथ जनार्दन पाटील हे आपल्या दुचाकी (एमएच १० डी सी २९१५) वरून भरधाव वेगाने निघाले होते. वाटेत या पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला नवनाथ पाटील यांच्या दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. यात नवनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचे बंधू राजाराम । पाटील यांनी तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची । माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अधिक तपास करीत आहेत.