Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार! 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख आली समोर;...

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार! 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख आली समोर; आताच नोट करा महत्त्वाचे अपडेट

सीबीएसईच्या दहावीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य मंडळाच्या निकालाकडे लागले आहे. दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्डाचा निकाल नेमका कधी लागणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, बारावीचा निकाल पुढील 2 ते 3 आठवड्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. असे वृत्त साम टीव्ही न्यूजने दिले आहे.

 

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education मंडळाने यंदा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. परीक्षा संपून आता जवळपास महिना उलटला असून उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

 

बारावीचा निकाल आधी, दहावीचा नंतर

 

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. यंदा सुमारे 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

दहावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सध्या युद्धपातळीवर सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाईल. साधारणपणे बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दहावीचा निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे मेच्या मध्यापर्यंत दहावीचा निकालही लागण्याची शक्यता आहे.

 

 

निकाल कुठे आणि कसा पाहणार?

 

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहू शकतात:

 

 

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org (बारावी)

sscresult.mkcl.org (दहावी)

mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आईचे नाव आवश्यक असेल. या तपशीलांच्या आधारे विद्यार्थी सहजपणे आपला निकाल ऑनलाईन पाहू शकतात.

 

 

विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली

 

दहावी आणि बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बारावीनंतर पुढील करिअरची दिशा ठरते, तर दहावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी निर्णायक ठरतो. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -