Friday, April 24, 2026
Homeब्रेकिंगमंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी! नागपुरात खळबळ; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर...

मंत्री नितीन गडकरींना जिवे मारण्याची धमकी! नागपुरात खळबळ; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह चित्रफित व्हायरल करीत जिवे मारण्याची धमकी (Nitin Gadkari threat case Nagpur) देणाऱ्या एका आरोपीविरोधात धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

सुमितकुमार राकेशकुमार चौहान (वय ४१ रा. अशोक मोहल्ला, नांगलोई, दिल्ली) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

 

आयुष रमेशचंद्र अग्रवाल (वय ४४, रा. मानेवाडा) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमितकुमार हे अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते १८ एप्रिलला नागपुरात आले होते.

 

दरम्यान, स्टेडियम परिसरात असताना त्यांनी फेसबुक सुरू केल्यावर त्यांच्या नावाने ‘एसके चव्हाण’ असा आयडी तयार करून त्यात एक चित्रफित अपलोड केल्याचे आढळले. त्यात नितीन गडकरी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करीत, त्यांच्यासह कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देताना एक व्यक्ती आढळला.

 

त्याने फेसबुकवरच नव्हे तर इन्स्टाग्रामवरही दोन आयडीच्या माध्यमातून समाजविघातक आक्षेपार्ह पोस्ट केल्याची बाब निदर्शनास आली. त्यावरून त्यांनी धंतोली पोलिस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -