प्रसिद्ध रॅपर-गायक हनी सिंगने त्याची पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या वर्षी, दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात शालिनीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती आणि हनी सिंगवर घरगुती हिंसाचारासह इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. रिपोर्टनुसार, दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर एक कोटी रुपयांवर करार झाला आहे. दिल्लीतील साकेत कौटुंबिक न्यायालयात हनी सिंगने पोटगी म्हणून सीलबंद कव्हरमध्ये पत्नीला एक कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 मार्च 2023 रोजी होणार आहे.
हनी सिंगने घटस्फोट घेतला
शालिनी तलवारने हनी सिंगकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती, पण दोघांमध्ये एक कोटीवर समझोता झाला. त्यांचे संबंध बरेच दिवस खराब चालले होते. दोघांच्या नात्यात कटूता आल्यानंतर शालिनी हनी सिंगपासून वेगळी राहत होती आणि आता घटस्फोटानंतर त्यांचे मार्ग पूर्णपणे वेगळे झाले आहेत.