ताजी बातमी ऑनलाईन टीम
सेक्सटॉर्शनने एका युवकाने बंद खोलीच्या लाकडी सराला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाटकूल (ता. मोहोळ) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. प्रतीक अनिल सवणे (वय 28, रा. पाटकूल) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
प्रतीक आई-वडिलाला एकुलता एक आहे. तो सोलापूर येथील एका महाविद्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. आई-वडील एका खोलीत तर प्रतीक हा वेगळ्या खोलीत झोपत असे. रात्री सर्वजण जेवण करून नेहमीप्रमाणे झोपी गेले. गुरुवारी सकाळी सात वाजता वडील अनिल प्रतीकला उठविण्यासाठी गेले आणि हाका मारल्या असता आतून काहीच प्रतिसाद येईना. संशय आल्याने वडिलांनी शेजारयांना बोलविले व प्रतीक दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. सर्वांनी दरवाजा तोडला व आत जाऊन पाहिले असता प्रतीकने घराच्या लाकडी सराला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले, तसेच त्याचे दोन्ही पाय लुंगीच्या साह्याने बांधलेल्या अवस्थेत होते. त्याच्या कमरेला पॅन्टजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे, ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी अनिल औदुंबर सवणे (वय 60, रा. पाटकूल) यांनी पोलिसांत खबर दिली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.
Solapur : पाटकूल येथील युवकाची आत्महत्या
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -