ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांच्या भरतीसाठी आयसीएमआरने अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आयसीएमआरची अधिकृत वेबसाईट main.icmr.nic.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
आयसीएमआरने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ परिचारिका, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, संशोधन सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, एमटीएस आणि तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 20 सप्टेंबर 2022 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावा.
ICMR Recruitment 2022 : महत्वाच्या तारखा –
– अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु
– अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 सप्टेंबर 2022
ICMR Recruitment 2022 : पदांचा तपशील –
– कनिष्ट वैद्यकिय अधिकारी – 1 पदं
– कनिष्ट परिचारिका – 1 पदं
– वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता – 1 पदं
– संशोधन सहाय्यक – 1 पदं
– डेटा एन्ट्री ऑपरेटर – 1 पदं
– एमटीएस – 1 पदं
– तांत्रिक सहाय्यक – 1 पदं
ICMR Recruitment 2022 : शैक्षिक पात्रता –
या भरती मोहिमेद्वारे अनेक पदांची भरती केली जाणार आहे. सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
ICMR Recruitment 2022 : वयोमर्यादा –
– कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
– कनिष्ठ परिचारिका आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
– वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, तांत्रिक सहाय्यक आणि संशोधन सहाय्यकांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
– MTS साठी वयोमर्यादा 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.