Monday, July 28, 2025
Homeसांगलीमिरजेची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुक 25 तास चालली : पोलीस अधीक्षक आणि...

मिरजेची ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुक 25 तास चालली : पोलीस अधीक्षक आणि अधिकारी पोलिसांनी मिरवणुकीत धरला ठेका :


ऐतिहासिक असणारी सांगली जिल्ह्यातील मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा 25 तास चालली. मिरज शहरात 250 सार्वजनीक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात आलं. या मिरवणुकीत अनेक राज्यातील हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते. मिरज येथील गणेश तलाव येथे सर्वात शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणेश मूर्तींच विसर्जन करून मिरवणुकीची सांगता झाली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलिसांनी मिरवणुकीत ठेका धरला. जलोशी वातावरणात पोलिसांनी मनसोक्त नृत्य केलं.

गणेश मिरवणुका, दरम्यान शांतता आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी फार परिश्रम घेतले होते. आणि या मिरवणुका शांततेत पार पडल्या. दरम्यान सांगली जिल्ह्यात एकूण अडीज हजार सार्वजनीक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात आलं. कोरोनामुळे मागील दोन वर्ष मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला गेला नव्हता. मात्र यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -