बॉलिवूडची बिनधास्त गर्ल म्हणून स्वरा भास्करची ओळख आहे. ती लोकांची पर्वा न करता आपले म्हणणे बेधडकपणे मांडते. यामुळे स्वरा चित्रपटांपेक्षा तिच्या विधांनामुळे जास्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा स्वराने असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिने बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानवर मोठा आरोप केला आहे.
एका मुलाखतीत स्वराने शाहरुख खानवर आरोप केला की, शाहरुखने तिचे लव्ह लाईफ उद्ध्वस्त केले आहे. मिडडेशी संवाद साधताना स्वराने हा आरोप केला असून ती म्हणाली की, ‘माझं लव्ह लाईफ उध्वस्त करण्यासाठी मी आदित्य चोप्रा सर आणि शाहरुख खानला जबाबदार धरते. शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मी तरुण वयात पाहिला आणि तेव्हापासून मी त्या ‘राज’च्या शोधात होते जो हुबेहूब शाहरुखसारखा ‘राज’ असावा. खऱ्या आयुष्यात ‘राज’ नसतो हे समजायला मला बरीच वर्षे लागली. त्यामुळे मी रिलेशनशिपमध्ये फार चांगली नाही असे मला वाटत नाही. सिंगल लाईफ कठीण असून जोडीदार शोधणे म्हणजे कचरा गाळून घेण्यासारखे आहे.’, असेही ती म्हणाली.
स्वरा भास्करचा मोठा आरोप, म्हणाली शाहरुख खानने ‘माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं’
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -



