ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यातील सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं पळवणारी टोळी आल्याचे समजत साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा गावामध्ये ही घटना उघडकीस आली. मुलं पळवणारी चोरांची टोळी आली असा समज ग्रामस्थांचा झाला आणि त्यांनी चार साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका करण्यात आली. अगदी थोड्यावरुनच पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती टळली आहे.
उत्तर प्रदेशातील आहेत साधू
हे चारही साधू उत्तर प्रदेशातील असल्याची माहित आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सांगली पोलिसांनी माहिती दिली की, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजली नाही. यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी आल्याच्या संशयातून गावकऱ्यांकडून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया
या साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळथ आहेत. उत्तर प्रदेशातील या साधूंच्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर लोक टीका करत आहेत. पालघरमधील मॉब लिचिंगचे प्रकरण अजून ताजे आहे. असे असतानाच ही घटना घडल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी देखील केली जातेय.
Sangli News: मुलं पळवणारी टोळी असल्याचे समजत चार साधूंना बेदम मारहाण, सांगलीतील घटना!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -