शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून ९२ लखांची फसवणूक करणाऱ्या एमएस ग्लोबलचा सर्वेसर्वा मिलिंद गाडवे याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे. कॉलेज कॉर्नर परिसरात गाडवे याने एस.एम ग्लोबल कंपनीचे कार्यालय सुरू केले होते गुंतवणूक दारांना अधिक आर्थिक लाभाचे आमिष दाखवण्यात आले होते. गुंतवणूकदारांना केलेली गुंतवणुकीची मुद्दल व त्यावरील व्याज देण्यास त्याने टाळाटाळ केली आहे.
या प्रकरणी आजपर्यंतच्या तपासात गाडवे यांनी ९२ लाख ४ हजार ४१७ रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे म्हणजे एकूण फसवणुकीचा आकडा निष्पन्न होईल, असे मत पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केले.






