Tuesday, April 30, 2024
HomeसांगलीSangli : कासेगावातील वृध्दाच्या खूनाचा अखेर उलगडा

Sangli : कासेगावातील वृध्दाच्या खूनाचा अखेर उलगडा

दारुच्या नशेत आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून वाळवा तालुक्यातील शेणे येथील मज्जिद युसूफ आत्तार (६०) यांचा डोक्यात दगड घालून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. हा खून हणमंत पाटील (रा. शेणे) याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कासेगाव पोलीस या खूनाचा तपास करत होते. मात्र खून कुणी केला याचा उलघडा होत नव्हता, अखेर त्यांना यश आले आहे.
शेणे येथील मज्जिद आतार यांचा खून दि. २१ जुलै रोजी झाला होता.

कासेगाव ते वाटेगाव जाणाऱ्या रस्त्यावर राजारामबापू साखर कारखाना गट ऑफिसच्या गेटसमोर सिमेंट काँक्रीटच्या दगडाने डोक्यात मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा खून कुणी केला याचे काहीच धागेदोरे पोलीसांकडे नव्हते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश यांच्या पथकाने संशयीत हणमंत पाटील याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देवू लागला. त्याच्याकडून अधिक तपास करून माहिती घेतली.

पाटील व आत्तार हे दोघे शेणे येथे राहिला होते. दि. २१ जुलै रोजी दुपारी आत्तार याने पाटील याला दारूच्या नशेत आई-बहिणीवरून शिवीगाळ केली होती. त्यावेळी आत्तार हा दारु पिला आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच दिवशी रात्री सव्वा नऊच्या सुमारास पाटील याने आत्तार याला दुपारी मला शिवीगाळ का केलीस, याचा जाब विचारला असता, आत्तार याने पाटील याला परत शिवीगाळ केली. पाटील याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो काही न ऐकता दारुच्या नशेत शिवीगाळ करु लागला. याचा राग पाटील याला सहन न झाल्याने आत्तार याला खालीपाडून पडलेला सिमेंट कॉक्रीटचा दगड डोक्यात घालून खून केल्याचे कुबली पोलीसांना दिली आहे.

पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये पोलीस हवलदार महेश गायकवाड, आनंदा देसाई, राहूल पाटील, दिपक घस्ते, अजित वंजारी, सुनिल पाटोळे, सचिन चव्हाण, संग्राम कुंभार, सुनिल पाटील, आनंदा चव्हाण, विजय पाटील, चंद्रकांत पवार, चेतन महाजन यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -