Tuesday, May 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : किणीत एका रात्रीत तीन घरे फोडली; चोरट्यांनी ४ ते ५...

कोल्हापूर : किणीत एका रात्रीत तीन घरे फोडली; चोरट्यांनी ४ ते ५ लाखाचा ऐवज केला लंपास

किणी( ता. हातकणंगले) येथे एका रात्रीत तीन कुलूप बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून चार तोळे सोन्यासह एक किलो चांदी व रोख रक्कम असा चार ते पाच लाख रुपयेचा ऐवज बुधवारी रात्री लंपास केला आहे. चोरट्यांनी चार दिवसात तब्बल पाच घरे फोडली असून यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा घरांचा समावेश आहे. बंद घर फोडून चोरीची सत्र वारंवार सुरू असून गेल्या सहा महिन्यात डझनभर बंद घरे फोडल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अधिक माहिती अशी की, विलास जीवनराव शिंदे हे आरोग्य खात्यात कर्मचारी असून ते नोकरीच्या ठिकाणी राहत असल्याने त्यांचा बंगला कुलूप बंद होता. याचा फायदा उठवत कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून तिजोरी फोडून सोन्याची चेन, अंगठी ,कर्णफुले, असे चार तोळे सोने, चांदीची मूर्ती, ताठ, वाटी , निरंजन अशी एक किलो चांदी अज्ञात चोरट्याने लंपास केली. तर हायस्कूल जवळील कुटुंबासह दुबईला पर्यटनासाठी गेलेले गौस दस्तगीर मनेर यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकले आहे. मणेर परतल्यानंतरच चोरीचा तपशील समजणार आहे.

याचबरोबर जवळच असणाऱ्या साई कॉलनीमध्ये भाड्याने राहत असलेले पोलीस कर्मचारी सलीम शेख घराला कुलूप लावून कुटुंबासह पाहुण्यांच्या गावी गेले होते त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश केला मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही या घटनेची माहिती मिळताच पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांनी भेट देऊन पाहणी करत श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. विलास शिंदे यांच्या घरापासून जुन्या महामार्गापर्यंत श्वानाने चोरट्यांचा मार्ग दाखवला. तर मनेर आणि शेख यांच्या घरापासून रस्त्या पर्यंतचा मार्ग दाखविला. चार दिवसात पाचघरे फोडली असून यामध्ये निवृत्त सहायक फौजदार व पोलीस कर्मचाऱ्यांचा घराचा समावेश आहे. कुलूप बंद घरे चोरट्याने लक्ष केली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -