Friday, July 4, 2025
Homeतंत्रज्ञानऑक्टोबरपासून क्रेडिट, डेबिट कार्ड टोकनाइज करावे लागणार; जाणून घ्या का आणि कसे...

ऑक्टोबरपासून क्रेडिट, डेबिट कार्ड टोकनाइज करावे लागणार; जाणून घ्या का आणि कसे करावे?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या गैरवापराबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 1 ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशनचे नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारी आरबीआयने 1 ऑक्टोबरपासून टोकनायझेशनचे नियम लागू आपण सज्ज असल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांत सायबर फ्रॉडच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक झाली आहे कारण त्यांनी भविष्यातील पेमेंटसाठी विविध मर्चंट वेबसाइटवर त्यांचा कार्ड डेटा संग्रहित केला होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कार्डच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि ऑनलाइन व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आरबीआय कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम लागू करणार आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यानंतर भविष्यातील पेमेंटसाठी कोणत्याही मर्चंट वेबसाइटवर कार्ड तपशील टोकानाइज स्वरुपात जतन केले जातील. त्यामुळे कार्डचे तपशील गुपीत राहण्यास महत होईल आणि पर्यायाने सायबर गुन्हेगारीला आळा बसेल. आरबीआयने यापूर्वी कार्ड टोकनीकरणाची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली होती.

कार्ड टोकनायझेशन म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचे तर टोकनायझेशन अंतर्गत तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्चेड तपशील म्हणजेच 16-अंकी क्रमांक, कार्डधारकाचे नाव, एक्सपायरी डेट आणि कोड भविष्यातील पेमेंटसाठी “टोकन” स्वरुपात जतन केले जातील आणि मर्चंट वेबसाइट्सद्वारे खरेदी करण्यासाठी तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे तपशील टाकण्याऐवजी हे टोकन वापरता येईल. हे टोकन म्हणजे तुमच्या कार्डचे वेगळे स्वरुप असेल. यामुळे तुमच्या कार्डचा मूळ तपशील सुरक्षित राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -