Friday, July 4, 2025
Homeअध्यात्मसंकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रविवारी टाळा 'या' चुका, सूर्य देव होतील प्रसन्न

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रविवारी टाळा ‘या’ चुका, सूर्य देव होतील प्रसन्न



काळे कपडे घालू नका
रविवारी काही रंगाचे कपडे घालणे अशुभ मानले जाते. त्यामुळे रविवारी निळा, काळा, आणि करड्या रंगाचे कपडे घालू नये. शक्य असल्यास या रंगाचे बूट घालणे देखील टाळावे.

मिठाचे सेवन टाळा
रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्य देवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी तेल आणि मिठाचे सेवन करू नये.

केस कापू नका
अनेक जण विशेषतः रविवारी दाढी-केस कापतात, मात्र असे करणे खूप चुकीचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी केस कापू नये. रविवारी तेलाने मालिश देखील करू नये.

तांब्याची वस्तू विकत घेऊ नये
भगवान सूर्य देवाची कृपा प्राप्त करायची असल्यास रविवारी तांब्याच्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये.

तामसी भोजन टाळा
रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. सूर्यदेव हे एकमेव देव आहे ज्यांचे मानवाला दररोज दर्शन होते. त्यामुळे रविवारी मांसाहार आणि मद्यापासून दूर राहावे.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -