Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील जनावरांना लम्पीचा धोका, लम्पीग्रस्त भटकी जनावरे रस्त्यावर

कोल्हापुरातील जनावरांना लम्पीचा धोका, लम्पीग्रस्त भटकी जनावरे रस्त्यावर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी स्किन आजरामुळे आडे आठ हजारांहून अधिक पशुंचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात आतापर्यंत 70 जनावरांना लम्पी झाला असून त्यातील दोन जनावरे दगावली. कोल्हापूर शहरातील भटक्या गाईंनाही लम्पी झाल्याचे आढळल्याने लम्पीचा प्रसार झपाटय़ाने होण्याची भीती व्यक्त होत आहे. भटक्या जनावरांचा शोध घेवून पुणे जिह्याच्या धरतीवर फिरते पथक नेमून तातडीने लसीकरण करणे, मोकाट जनावरांना स्वतंत्रपणे क्वारंटाईन करण्याची मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


शहरातील महापालिका, लक्ष्मीपूरी, सीबीएस परिसर, सर्वच भाजी मंडई आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात मोकाट गाईंचा वावर आहे. यातील अनेक गाईंच्या अंगावर मोठे फोड उठले आहेत. अतिशय अशक्त झालेली जनावरे संथ गतीने वावर करत असून त्यांच्या तोंडातून मोठय़ा प्रमाणात लाळ गळत आहे. ही जनावरे सतत ठिकाणे बदलत असतात. शहरात मच्छर आणि माशांसह गोचीडांचे प्रमाणही अधिक आहे. ही जनावरे गोठय़ातील सुरक्षित पशूधनासाठी घातक ठरत आहेत. कोल्हापुरातही सुमारे पाचशेहून अधिक मोकाट जनावरे रस्त्यावर असल्याची माहिती आहे.



जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्वतंत्रपणे मोहीम उघडून मोकाट जनावरे स्वतंत्र ठेवण्यासह औषधाची व्यवस्था करण्या15 सप्टेंबपर्यंत संपूर्ण देशात 80 हजारांहून जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यनिहाय विचार करता राज्यस्थानमध्ये सर्वाधिक 45063, पंजाबमध्ये 16866, गुजरातमध्ये 5344 आणि हरियाणात 1810 जनावरांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरात 8 लाख 54 हजार पशूधन आहे.

त्यामध्ये दोन लाख 83 हजार गाई आहेत. एक लाखाहून अधिक जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत 73 जनावरांना लम्पी झाला असून शनिवारी संध्याकाळपर्यंत दोन जनावरे दगावली आहेत. विशेष म्हणजे लम्पी आजाराग्रस्त जनावराचे दूध पिल्याने किंवा संपर्कात आल्याने मानवी जीवास कोणताही धोका होत नसल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

ही आहेत लक्षणं आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. सुरुवातीस ताप येतो. दुधाचे प्रमाण वेगाने कमी होते. दूध देणेच बंद करतात. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. हळूहळू डोके, मान, मायांग, कास आदी भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. जनावरे लाळ गाळतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळयातील व्रणामुळे चिपडे येतात. दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -