Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक… बापचं ठरला नराधम ! सावत्र बापाने मुलीलाच केलं वासनेची शिकार

धक्कादायक… बापचं ठरला नराधम ! सावत्र बापाने मुलीलाच केलं वासनेची शिकार

बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घडला मुंबईतील मुलुंडमध्ये (Mumbai Mulund news) घडली आहे. नराधम बापाने आपल्या सावत्र अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (father sexually assaults stepdaughter) केले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी (Mumbai Police) नराधम बापाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपी 50 वर्षांचा असून पीडिता ही 15 वर्षांची आहे. आरोपी मुलीवर 2020 पासून अत्याचार करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

पीडितेच्या आईने दिली होती समज, तरीही…

पीडितेच्या आईने या प्रकरणाला वाच्या फोडली आहे. नराधमाविरुद्ध मुलुंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईला आरोपी त्याच्याच घरात मुलीवर अत्याचार करताना या पूर्वी देखील आढळून आला होता. परंतु तिने त्यावेळी त्याला केवळ समज दिली होती. मात्र, नराधमाचे दृष्कर्म थांबले नाहीत. अखेर तिने मुलुंड पोलिस स्टेशन गाठून त्याच्या कृकृत्याचा चिठ्ठा उघडला. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.

आरोपीला तीन मुली…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा वाहनचालक असून त्याला दोन मुली आहेत. आरोपी आणि पीडितेची आई यांच दुसरं लग्न झालं होतं. मात्र, कौटुंबीक वादामुळे ती विभक्त राहते.आरोपीने याचाच फायदा घेत 2020 पासून तो 15 वर्षीय सावत्र आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.

पीडितेची आई 2011 मध्ये पहिल्या पतीपासून विभक्त झाली. नंतर ती ठाण्यात राहात होती. पीडित मुलगी आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. सन 2013 मध्ये तिची आणि आरोपीची भेट झाली. त्याच्यात संबंध प्रस्थापित झाले. परंतु आरोपी आधीपासून विवाहित होता. त्याला दोन मुली आहेत. तो पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर 2014 मध्ये पीडितेची आई आणि आरोपीने लग्न केलं. लग्नानंतर ती पीडित मुलीसह आरोपीकडे मुलुंड येथे राहात होती.

लॉकडाऊनच्या काळात पहिल्यांदा केला अत्याचार

पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात सगळे खोपोली येथे त्यांच्या मूळ गावी गेले होते.तेव्हा नराधमाने पीडितेसोबत लैंगिक चाळे केले होते. हे पीडितेच्या आईच्या लक्षात आलं होतं, तेव्हा तिने आरोपीला समज दिली होती. मात्र, आरोपी तरी सुधारला नाही. त्याने पीडितेवर अत्याचार सुरूच ठेवला. गेल्या शुक्रवारी नराधमाने पुन्हा एकदा पीडितेला आपल्या वासनेची शिकार केलं. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसां जाण्याचा निर्णय घेतला.

आरोपी बापाविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलुंड पोलिस पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -