Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्रआज संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात 'यलो अलर्ट'!

आज संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’!

गेल्या काही दिवसांपासून पावसाने  विश्रांती घेतली होती. मात्र आता पाऊस (Rain) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यासोबत देशभरात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परतीच्या पावसासाठी राज्यातील वातावरण हे पोषक झाले असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. आता पुढचे काही दिवस पावसाचा जोर  कायम राहणार आहे. दरम्यान विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नारिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. यानंतर आज शुक्रवारीही मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारपासूनच राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा देण्यात आलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -