Sunday, February 23, 2025
Homeक्रीडाT20 WC IND vs PAK: महामुकाबल्यावर महासंकट! भारत पाकिस्तान सामना रद्द होण्याची...

T20 WC IND vs PAK: महामुकाबल्यावर महासंकट! भारत पाकिस्तान सामना रद्द होण्याची शक्यता

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सध्या सर्व क्रिकेटप्रेमी एकाच दिवसाची वाट पाहतायत. तो दिवस म्हणजे पुढचा रविवार. 23 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर मोठं महायुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेलबर्नमध्ये वर्ल्डपकपचा सामना होणार आहे. मात्र यापूर्वीच चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरू शकतं. आणि यामागचं मोठं कारण ठरू शकतो तो म्हणजे पाऊस.



T20 वर्ल्डकप 2022 मध्ये, 23 ऑक्टोबर रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्याची मजा मेलबर्नचं हवामान खराब करू शकतं. मेलबर्नमध्ये त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे क्रिकेटच्या महायुद्धाचा खेळ पावसामुळे खराब होण्याची भीती आहे.

वेदर फोरकास्ट एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियातील 3 राज्यांवर पावसाचा प्रभाव दिसून येईल. यावेळी हवामानही थंड राहणार आहे. मेलबर्नमध्येही हवामान असंच राहण्याची शक्यता आहे.

हवामानाची माहिती वेबसाइट AccuWeather प्रमाणे, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी मेलबर्नमध्ये पाऊस पडू शकतो. त्यानंतर दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एक दिवस अगोदर म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी सामन्याच्या एक दिवस आधी वातावरण ढगाळ राहील. तर दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर तो दिवस संपूर्ण पावसाची संततधार होऊ शकतो.

वर्ल्डकपपूर्वी आयसीसीने सर्व कर्णधारांची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. यावेळी कॅप्टन रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक उत्तरं दिली. तसंच पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबतही रोहितने संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -