ताजी बातमी ऑनलाईन टीम
जागतिक अन्न दिन दरवर्षी ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तो प्रथम 1981 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. उपासमारीने त्रस्त लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच पौष्टिक आहार घेतल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
जर तुम्ही नाश्त्यात समोसा, मिसळ पाव आणि वडापाव खात असाल तर आताच सावधान व्हा. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संसाराचा गाडा सांभाळण्यासाठी नवरा बायको दोघेही कामावर जातात. खाजगी कंपनींचं प्रमाण झपाट्याने वाढल्यामुळे सध्या वर्क कल्चर बदलेलं आहे. नाईट शिफ्ट, सकाळी 6 ची शिफ्ट त्यामुळे अनेकांचा बाहेरील पदार्थ खाण्याचा कल वाढलं आहे. आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर समोसा, वडापाव, मिसळ, इडलीसांबार हे पदार्थ सहज कुठल्याही वेळत उपलब्ध असतात. त्यामुळे आपण नाश्त्यात अनेक वेळा हे पदार्थ खातो.
पूर्वी नाश्त्त्यात चहा पोळी, भाकरी भाजी, पोहे हे पौष्टिक पदार्थ खाण्याची परंपरा होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये सगळंच बदलं आहे. लोकांचा Street Food खाण्यावर कल वाढला आहे. अशात त्यांना अनेक आरोग्याचा समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. सकाळची सुरूवात ही पौष्टिक नाश्ताने झाली पाहिजे त्यामुळे तुमचं शरीर संतुलित राहण्यास मदत होतं.
मिसळपाव
आज आपण जाणून घेऊयात कोणते पदार्थ खाल्ल्यास शरीरात कोणते SYMPTOMS दिसतात. यातला पहिला पदार्थ आणि प्रत्येकाचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळ पाव. अनेकदा तुम्ही नाश्त्याला मिसळ पाव खात असालंच. मिसळवरची तर्री इतकी भारी लागते की असा नाश्ता तुम्ही नाकारू शकत नाही. पण सकाळच्या वेळी कडधान्याने तयार केली मिसळ ही आपल्या शरीरासाठी घातक आहे. मिसळ पाव खाल्यानं शरीरातलं पौष्टिक मूल्य कमी होतं, आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. पावातून कॅन्सरजन्य घटक शरीरात जात असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वीच या संदर्भात एक अहवाल समोर आला होता. ज्यात मैद्याने बनलेला पाव किंवा ब्रेड खाण्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले होते. त्यामुळे ब्रेड खाणं शक्यतो टाळा.
समोसा हा तर अनेकांचा जीव की प्राण…समोसा हा पदार्थ अनेकांना खूप आवडतो. त्यामुळे अनेक जण नाश्त्याला समोसा रोज खात खातात. जर तुम्ही अशी चुकू करत असाल तर लगेच सोडून द्या… मैद्यापासून बनलेला, बटाट्याचं mixture असलेला, तळलेला सामोसा खाल्लात तर तुमची सकाळ आणि अख्खा दिवस खराब होतो. समोस्याने तुमचं पोट भरत पण तुमचं शरीर कायमस्वरुपी अनहेल्दी होतंय. समोस्याने तुमच्या शरीरातील अँसिडीटी वाढते. अनेक जण पोट भरण्यासाठी समोसा आणि पाव खातात कारण ते खिशाला परवडतं. पण आता जरी ते परवडत असेल तरी दूरचा विचार केल्यास आरोग्यावर मोठ्या खर्च होऊ शकतो.
जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा मुंबईचा वडापाव…हा देखील नाश्त्यात खाल्ल्यास तुमच्यासाठी धोकादायक आहे. कारण बटाटा, बेसन यामुळे अँसिडीटी होते
त्यामुळे सकाळी नाश्त्याला वडापाव खाताना एकदा नाही तर किमान दोनदा तरी विचार करा.सकाळच्या वेळेत बटाट्याचे सेवन शक्यतो करु नका. तसंच तेलकट पुरी आणि बटाट्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन देखील तितकंसं चांगलं नाही. त्यामुळे पुरी आणि बटाट्याच्या भाजी देखील नाश्त्यासाठी avoid करा.