Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्र'साई मंदिराच्या मागे...' मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं...

‘साई मंदिराच्या मागे…’ मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं कारण

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जिल्ह्यातील एका 28 वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्वत:च मतदान ओळखपत्र मोबाईलवर स्टेट्स म्हणून ठेवल. त्यावर भावपूर्ण श्रध्दांजली असं लिहिलं. दुसऱ्या पोस्टवर त्याने साई मंदिराच्या मागे, सेनगाव असं लिहिलं. त्यानंतर त्याने स्वत:च आयुष्य संपवलं, तरुणाच्या आत्महत्येचं कारण मन सुन्न करणारं आहे.



तरुणाने का उचचलं टोकाचं पाऊल?
नवल जयराम नायकवाल असं मृत तरुणाचं नाव असून तो 28 वर्षांचा आहे. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील कारेगाव इथं नवल रहायचा. शनिवारी तो शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडला, पण घरी परतलाच नाही. रविवारी सकाळी सेनगाव शहरातील साई मंदिरा शेजारील बाभळीच्या झाडाला लटकेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी बघितला, त्यानंतर तारुणांनी ही घटना पोलिसांना कळविली. पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवून नातेवाईकांना कळविलं. सेनगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

आत्महत्येचं मन सुन्न करणारं कारण
नवल यांच्या वडिलांच्या नावे कारेगाव शिवारात पाच एकर शेती आहे. या शेतात सोयाबीन कापूस आणि इतर पिके घेतली आहेत. त्याच शेतीवर त्यांनी पेरणीसाठी 70 हजाराचे पीककर्ज घेतलं आहे. यंदा अतिवृष्टीने नुकसान झाले मग हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत नवल होता. या चिंतेमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं सेनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटलं आहे. नवलने वडिलांना हातभार लागावा म्हणून गावात हमाली काम सुरू केली होती. या पैशातून वडिलांचं कर्ज फेडण्याचा तो प्रयत्न करीत होता.

मात्र कर्ज फेडण्यात त्याला यश येत नसल्याने त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. शनिवारी संध्याकाळी तो शेताकडे जातो असे घरी सांगून घरा बाहेर पडला. शनीवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान त्याने स्वतःच्या व्हाट्सअप्प स्टेटसवर स्वतःच मतदान ओळखपत्र ठेवलं आणि नवल भावपूर्ण श्रध्दांजली अस त्याखाली लिहिलं. दुसऱ्या स्टेट्सवर साई मंदिराच्या मागे असे ही लिहले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -