Monday, July 7, 2025
Homeमनोरंजनपुण्याचा 'गोल्डन बॉय' घेणार सलमान खानच्या घरामध्ये धमाकेदार एन्ट्री

पुण्याचा ‘गोल्डन बॉय’ घेणार सलमान खानच्या घरामध्ये धमाकेदार एन्ट्री

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुण्याचा गोल्डन बॉय सनी नानासाहेब वाघचौरे लवकरच सलमान खानच्या घरात एंट्री करणार आहे. खरतर सलमानचा हा शो सुरु होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. आत्तापर्यंत घरातील काही स्पर्धक त्यांच्या मैत्रीमुळे चर्चेत आहेत तर काही स्पर्धक भांडण करून घरातील वातावरण गरम ठेवत आहेत. मात्र आता या शोच्या घराचा सीझन बदलण्याची तयारी करण्यात आली आहे.



यापूर्वी फहमान खानने या शोमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दावा केला गेला की तो या सीझनचा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे पण तसं झालं नाही. आता सीझन 16 मधील पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. या सीझनमध्ये गोल्ड बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला सनी नानासाहेब वाघचोरे या शोमध्ये प्रवेश करणार आहे.

सनीने शेअर केली पोस्ट
सनी नानासाहेब वाघचोरे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात आणि आता ते पहिले वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून टीव्हीच्या सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये प्रवेश करत आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

सनी यांनी इंस्टाग्रामवर ‘बिग बॉस’चं एक पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ‘अखेर आता हे स्वप्न पूर्ण होतयं. बिग बॉस 16 मध्ये प्रवेश. सनी वाघचौरेच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आता बिग बॉसमध्ये सनी काय बदल आणणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.

गोल्डन बॉय एमसी स्टॅनला देणार टक्कर
गोल्डन बॉय त्याच्या चाहत्यांमध्ये दागिन्यांसाठी ओळखला जातो मात्र ‘बिग बॉस 16’ मध्ये आधीपासूनच एक स्पर्धक आहे जो त्याच्यासारखाच आहे. आम्ही बोलत आहोत एमसी स्टेनबद्दल, ज्यांच्या गळ्यातल्या गोल्डवरुन सलमान खाननेही त्याला अनेकदा विचारलं आहे. इतकंच नाही तर स्टेनच्या शूजलाही शोमध्ये हायलाइट करण्यात आलं आहे. पण आता या बाबतीत गोल्डन बॉय आणि स्टेनमध्ये चांगलीच टक्कर होऊ शकते. दोघांना आमने-सामने पाहण्यासाठी चाहतेही कमालीचे उत्सुक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -